पुणे: पुण्यात उदय सामंत यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. तो राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला. असा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल केला होता. या वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आमदार पडळकर यांच्या विरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. आणि आमदार पडळकर यांच्या विरोधात तक्रार दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नेत्या रूपाली ठोंबरे आदी उपस्थित होत्या.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले होते कि, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक गळ्यात भगवा घालून ते शिवसेनेच्या नावाने घोषणा देत आहेत. उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यात पुण्यात मोठ्या प्रमाणे शिवसैनिक नाहीत ते राष्ट्रवादीचे लोक आहेत. आणि याच लोकांनी उदय सामंत यांच्यावर हल्ला केला असेल?
दरम्यान, पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहे. त्यांनी थेट गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात तक्रार केली आहे. तसेच वकीलांकडून त्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. पडळकरांनी सगळ्यांची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहरप्रमुख प्रशांत जगताप यांनी केली आहे.