नवी दिल्ली : Coincidence in politics – गुजरातच्या सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेससाठी एक आणखीन मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना कालच दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली असताना आज पुन्हा एकदा राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. दरम्यान राहुल गांधी यांची खासदारकी रद्द (Rahul Gandhi’s MP gone) झाल्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) चेर्चेत (discussion) आले आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. (Coincidence in politics )
राहुल गांधी यांनी 10 वर्षापुर्वी ती चुक केली नसती तर कदाचीत
राहुल गांधी यांनी 10 वर्षापुर्वी ती चुक केली नसती तर कदाचीत त्यांना आज आपली खासदारकी वाचवता आली असती. तेव्हा नेमकं 10 वर्षांपूर्वी राहुल गांधींनी असं काय केलं होतं आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग का चर्चेत आले हे आपण जाणून घेऊया.
देशाचे तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना मानहाणीकारकपणे २०१३ साली वटहुकूम परत घ्यावा लागला. त्यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भर पत्रकार परिषदेत आपल्याच पक्षाच्या पंतप्रधानांनी काढलेला वटहुकूम फाडला होता. या वटहुकूमात सर्वोच्च न्यायालयाने २०१३ मध्ये एक निर्णय दिला होता. त्यानुसार खासदार किंवा आमदारांना दोन वर्षापेक्षा अधिकची शिक्षा ठोठावल्यास त्याचे सदस्यत्व तात्काळ रद्द होते आणि त्याला पुढील निवडणुकाही लढवता येणार नाही असे सांगितले होते.
त्यामुळे तेंव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजकारण्यांचे संरक्षण व्हावे यासाठी एक अध्यादेशही काढला होता. पण त्या अध्यादेशाला राहुल गांधी यांचा विरोध होता. विशेष म्हणजे खासदार आमदारांच्या संरक्षणार्थ मनमोहन सिंग यांनी जो अध्यादेश आणला होता. त्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली जाणार होती. पण त्या ठिकाणी राहुल गांधीनी तो अध्यादेश अतिशय फालतु असल्याचे म्हणत तो भर पत्रकार परिषदेत फाडून टाकला होता.
या वटहुकूमाला गांधी यांनी कडाडून विरोध केल्याने मनमोहन सिंग यांना हा वटहुकूम परत घ्यावा लागला होता. तो वटहुकूम परत घेतला नसता तर आज राहुल गांधींना या कायद्याची मदत झाली असती. त्यांची खासदारकी वाचली असती. राजकारणातील या योगायोगाची चर्चा लोकसभा सचिवालयाच्या आज निर्णयानंतर आज सुरू झाली. तसेच तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या तत्कालीन निर्णयामुळे आता त्यांच्या लोकसभेच्या सदस्यत्वावर गदा येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत टीका करणं राहुल गांधींना चांगलंच महागात पडलं आहे. गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे काँग्रेस चांगलच आक्रमक झालं आहे.
कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व संविधानाच्या कलम 102 (1) (ई) आणि लोकप्रतिनिधी कायद्यानुसार रद्द करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 8 नुसार खासदार किंवा आमदाराला कोणत्याही परिस्थितीत दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास त्यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द केले जाईल. एवढेच नाही तर शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना सहा वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. अशा परिस्थितीत राहुल गांधींना शिक्षा झाली तर ते 2024 आणि 2029ची लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाहीत. त्यामुळे राहुल गांधी बरोबरच काँग्रेससाठी तो मोठा धक्का असेल.