CM Eknath Shinde : ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या कॉमनमॅन इमेजसाठी ओळखले जातात. मुख्यमंत्री होण्या अगोदरही ते त्यांच्या दिलखुलास स्वभावामुळे सगळ्याचे चाहते होते. आजही त्याचीच प्रचिती ठाणेकरांना आली. दिवाळीनिमित्त ठाण्यात ठिकठिकाणी दिवाळी पहाट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळ पासूनच मुख्यमंत्री यांनी या कार्यक्रमांना भेटी देत ठाणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, ठाण्यातील प्रसिद्ध आशा मामलेदार मिसळीचा अस्वादही त्यांनी यावेळी घेतला. त्यांच्यासोबत आमदार प्रताप सरनाईक, रविंद फाटक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा होते. मिसळीचा आस्वाद घेतल्यानंतर त्याचं बिल मुख्यमंत्री यांनी स्वतः दिलं आणि आपण कसे कॉमन मॅन आहोत हे दाखवून दिले. मुख्यमंत्र्यांच्या या वागणूकीमुळे उपस्थित शिवसेना कार्यकर्ते आणि ठाणेकर नागरिक भारावून गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री यांचा जयजयकार केला.
ठाण्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी ठाण्यात तरूणाईचा जल्लोष पाहिला. सर्वांना मी शुभेच्छा दिल्या. राज्यातही सर्वत्र दिवाळीनिमित्त उत्साहाचं वातावरण असल्याच त्यांनी सांगितलं. सर्वत्र उत्साह जल्लोष बघायला मिळाला. राज्यातील सर्व संकट अरिष्ट दूर व्होवो. दिवाळी सुरू झाली, काल फुसका बार आला पण तो वाजलाच नाही. आमच्या कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा एवढा आवाज होता की त्यांना यु टर्न घ्यावा लागला. दिवाळीच्या दिवसांत आशा प्रकारे विघ्न घालायला कोणत्याही राजकीय नेत्याने येणं चुकीचं आहे. काल आमच्या कार्यकर्त्यांनी शक्तीचं दर्शन दाखवलं आणि आपले सण परंपरा जपण्याचा प्रयत्न केला. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेशी संवाद साधताना म्हटले. Eat Misila and paid the bill himself