पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते” असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या पुणे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा व पुणे शहर अनुसूचित जाती मोर्चा भाजपा व पिंपरी चिंचवडराच्या वतीने पुण्यात आज मंगळवारी (ता.३) जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर निषेध करण्यात आला.
भाजपच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अनुसूचित जाती मोर्चा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार सुधाकर भालेराव, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) मयुर कांबळे, शहराध्यक्ष भिमराव साठे, उपाध्यक्ष उत्तम कांबळे, सचिन शिंदे, जयदास साळवे, दिपक मराठे, सुर्यकांत भोसले, कोमल शिंदे, अतुल साळवे, डॉ भरत वैरागे, रावसाहेब राखपसरे, शशीकांत सोनवणे, मनोज तोरडमल, अमर बोराडे, आरती साठे, संदिप ओव्हाळ, विष्णू सोनवणे व भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.