मुंबई : Chitra Wagh News : शिवसेना उपनेत्या शितल म्हात्रे (sheetal)यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट कमेंट व मॉर्फ व्हिडिओ सोशल माध्यमांवर प्रसिध्द झाल्याने राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे राजकणात आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. तसेच चांगलेच राजकारण तापले आहे. महिलांवर अन्याय अत्याचार झाल्यास त्यांच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या नेत्या म्हणून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh News) प्रसिध्द आहेत.
शीतल म्हात्रे प्रकरणात वाघ यांची कोणतीही प्रतिक्रिया येत नसल्याची चर्चा होती.
मात्र या वादात आता वाघ यांनी उडी मारली असून व्हायरल व्हिडीओवरून वाघ म्हणाल्या, हा विषय फक्त शितल पुरता मर्यादीत नाही तर राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील. म्हणून शीतल तू लढत राहा, आम्ही तुझ्या सोबत आहोत असे वाघ म्हणाल्या आहेत.
शिंदे गटातील नेतेमंडळी तसेच भाजपातील नेतेमंडळी म्हात्रे यांच्या मदतीसाठी धावून आले आहे. यातच आज भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी याच मुद्द्यांवरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
वाघ म्हणाल्या, राजकारणात काम करणाऱ्या महिलांना कशा प्रकारे त्रास दिला जातो हे तुम्ही आजवर पहिले असेल. मात्र आता विकृतीने कळस गाठला आहे. नुकताच मी एक व्हिडीओ पहिला शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा हा मॉर्फ व्हिडीओ आहे. एखाद्या बाईला तुम्ही थांबवू शकले नाही त्यामुळे तुम्ही तिच्या चारित्र्यावर प्रश्न उठवता. तिचे विकृत व्हिडीओ बनवून तिची बदनामी केली जाते. हा विषय फक्त शीतल पुरता मर्यादीत नाही तर राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे हा लढा सर्वानी मिळून लढला पाहिजे.