Rajasthan Chief Minister : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल नुकताच लागला लागला आहे. या पाचपैकी तीन राज्यांमध्ये भाजपाला बहुमत मिळालं आहे. भाजपाने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यावर आपल वर्चस्व गाजवलं आहे. (Rajasthan Assembly elections)
तर कॉंग्रेसने तेलंगणावर ताबा मिळवला असून रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीने मात्र अद्याप तीनपैकी एकाही राज्यात सत्तास्थापन केलेली नाही. भाजपा अद्याप त्यांच्या मुख्यमंत्र्यांची नावं निश्चित करू शकलेली नाही. (Defense Minister Rajnath Singh)
दरम्यान, मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी भाजपकडून राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे, सरोज पांडेय यांना राजस्थानचे पर्यवेक्षक म्हणून नेमणूक केली आहे. (BJP General Secretary Vinod Tawde)
तसेच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, के. लक्ष्मण आणि आशा लकडा यांना मध्य प्रदेशची जबाबदारी दिली आहे. तर अर्जुन मुंडा, सर्वानंद सोनेवाल, दुष्यंत गौतम यांची छत्तीसगडचे पर्यवेक्षक म्हणून नेमलं आहे. हे पर्यवेक्षक सर्व आमदारांची बैठक घेऊन त्याचं मत जाणून घेतील. त्यानंतर भाजपा हायकमांडच्या मंजुरीनंतर रविवारपर्यंत अंतिम निर्णय घेतील. (Saroj Pandey)
तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्री निवडीबाबत भाजपामध्ये खलबत सुरु असून विधानसभा निवडणूक जिंकणाऱ्या भाजपाच्या ११ खासदारांनी लोकसभेचा राजीनामा दिला आहे. या खासदारांपैकी काही नेते तिन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. रविवारीच मुख्यमंत्र्यांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत
राजस्थान : वसुंधराराजे सिंधिया, दिया कुमारी, ओम बिर्ला, भूपेंद्र यादव, गजेंद्र सिंह शेखावत, बाबा बालकनाथ
मध्य प्रदेश : शिवराज सिंह चौहान, प्रह्लाद पटेल, नरेंद्र सिंह तोमर, कैलास विजयवर्गीय आणि ज्योतिरादित्य सिंधिया
छत्तीसगड : रमन सिंह, भाजपा प्रदेशाध्यक्ष अरूण साव, रेणुका सिंह आणि ओ. पी. चौधरी
भारतीय जनता पार्टी के संसदीय बोर्ड ने राजस्थान, मध्य प्रदेश एवं छत्तीसगढ़ में पार्टी विधायक दल के नेता के चुनाव हेतु केंद्रीय पर्यवेक्षकों की नियुक्ति की है। pic.twitter.com/UYv1goanjI
— BJP (@BJP4India) December 8, 2023