मुंबई – आरे कारशेडवरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हटवली आहे. त्यामुळे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. आरेमध्ये कारशेड करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात निर्णय झाला होता. मात्र, यावर महाविकास आघाडीने स्थगिती आणली होती. आता ही स्थगिती मुख्यमंत्र्यांनी हटवली आहे. आरे कारशेडच्या कामासाठी आता सरकारी हालचाली सुरू झाल्या आहेत.
तसेच, उद्धव ठाकरे सरकारने आरे कॉलनींमध्ये होणारा हा प्रकल्प रद्द केला होता. त्यानंतर शिंदे सरकारने पहिल्याच बैठकीत ठाकरे सरकारचा निर्णय फिरवत पुन्हा एकदा मेट्रो 3 चे कारशेड हे आरे कॉलनीमध्येच होणार असल्याचे जाहीर केले होतं. यानंतर आता आरे कारशेडवरील बंदी हटवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.