लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तब्बल ५६ कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचगणी शहरासाठी ५६ कोटी रुपयांच्या मागणीच्या १२ प्रस्ताव दिले आहेत. या प्रस्तावांना शासकीय मंजुरी मिळाली तर आगामी काळात पर्यटन नगरी पाचगणी आणखी सुशोभित होणार आहे.
पाचगणी शहराच्या विकासासाठी सादर केलेले ५६ कोटीचे प्रस्ताव:
१)नगरपालिका हद्दीतील फा. प्लॉ. नं. १७०/१ येथे व्हेजिटेबल मार्केट विकसित करणे (६ कोटी)
२)नगरपालिका हद्दीतील “टेबल लॅण्ड” व परिसर विकसित करणे (४ कोटी)
३)नगरपालिका हद्दीतील “पारसी पॉईंट” विकसित करणे (३ कोटी)
४)नगरपालिका हद्दीतील टेबल लॅण्ड कडे जाणारा रस्ता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सेंट जोसेफ चर्च पर्यंत काँक्रीटीकरण करणे (२ कोटी)
५)नगरपालिका हद्दीतील “चेसन रोड” चे रस्ता रुंदीकरण व पावसाळी गटर विकसित करणे (४ कोटी)
६)नगरपालिका हद्दीतील “डॉक्सन रोड” चे रस्ता रुंदीकरण व पावसाळी गटर (४ कोटी)
७)नगरपालिका हद्दीतील “भाऊसाहेब भिलारे स्टेडियम” विकसित करणे (५ कोटी) ८)पारसी पॉईंट येथे “नाना नानी पार्क” विकसित करणे (३ कोटी)
९)पांचगणी- महाबळेश्वर मुख्य रस्त्याला पोलीस स्टेशन ते शॉपिंग सेंटरपर्यंत व बेबी पॉईंट चौक येथे काँक्रीटीकरण करणे (४ कोटी)
१०)”स्वच्छ भारत पॉईंट” कडे जाणारा रस्ता कॉक्रीटीकरण करणे (४ कोटी)
११)”सिडने पॉईंट” कडे जाणारा रस्ता कॉक्रीटीकरण करणे (३ कोटी)
१२)बसस्टँड येथे पार्किंग विकसीत करणे (१० कोटी) १३)नगरपालिकाहद्दीमध्ये विविध ठिकाणी अंडरग्राउंड सिवरेज लाईन व पॅकेज एस.टी.पी. विकसित करणे (५ कोटी)