मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रालयात सत्यनारायण पूजा करणे महागात पडले आहे. हि पूजा अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याप्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्याने थेट ठाणे न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
धनाजी सुरोसे असे सत्यनारायण पूजेचा विरोध दर्शविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी राजभवनात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथ विधीनंतर आपले सरकार व्यवस्थित चालावे. यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी ७ जुलै रोजी मंत्रालयातील मुख्यमंत्री दालनात सत्यनारायण पूजा करून कारभाराला सुरुवात केली होती. मात्र मंत्रालयातील सत्यनारायणाची पूजा हि अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहे. असे सांगून सामाजिक कार्यकर्ते धनाजी सुरोसे यांनी भारतीय दंड विधायक कलम ४०६ प्रमाणे ठाणे न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते धनाजी सुरोसे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार आहे. तसेच याप्रकरणी ठाणे न्यायालयातून न्याय न मिळाल्यास मुंबई सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. असा इशारा धनाजी सुरोसे यांनी दिला आहे.