Wednesday, May 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

chhatrapati sambhajinagar : ठाकरे बंधूंच्या युतीला छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरुंग; मनसे जिल्हाध्यक्षांचा ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदे गटात प्रवेश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 24 December 2025, 20:25
chhatrapati sambhajinagar

PHOTO- social media

Chhatrapati Sambhajinagar : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी युतीची घोषणा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. राज्यभरात या युतीचा जल्लोष साजरा होत असतानाच, छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी पक्षाला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे एका बाजूला युतीचा आनंदोत्सव सुरू असताना दुसऱ्या बाजूला मनसेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले आहे. (Chhatrapati Sambhajinagar)

१७ वर्षांचा संघर्ष विसरणे अशक्य; खांबेकर यांची नाराजी

सुमित खांबेकर यांनी तडकाफडकी पक्ष सोडण्याचे कारण सांगताना ठाकरे गटासोबतच्या युतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “गेल्या १७ वर्षांपासून मी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या विरोधात संघर्ष केला आहे. त्यांच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध आवाज उठवला आणि जनतेचे प्रश्न मांडले. आता अचानक त्यांच्याच सोबत बसणे मला वैयक्तिकरित्या शक्य नाही,” अशी स्पष्ट भूमिका खांबेकर यांनी मांडली. या युतीमुळे कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मोठी अडचण झाल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. (Chhatrapati Sambhajinagar)

 

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास

पक्षप्रवेशावेळी खांबेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. “राज्यात आणि शहरात जर खऱ्या अर्थाने कोणाला विकास करायचा असेल, तर ते फक्त एकनाथ शिंदेच करू शकतात. त्यांच्या कामाचा वेग पाहून मी त्यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्याशी सुरुवातीपासून एकनिष्ठ राहिल्यानंतरही केवळ राजकीय अपरिहार्यतेमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत युतीची ऐतिहासिक घोषणा

दरम्यान, मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीवर शिक्कामोर्तब केले. याप्रसंगी खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. मुंबईचा महापौर हा मराठीच असेल आणि तो या युतीचाच होईल, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. मराठी माणसाच्या हितासाठी सर्वांनी या युतीच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. मात्र, या युतीचे पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटण्यास सुरुवात झाली असून, आगामी काळात आणखी काही फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन! साखर आणि फळ उत्पादकांसाठीही दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Wednesday, 27 May 2026, 20:52

जामिनावर सुटका होताच अग्रवाल कुटुंबाचा जल्लोष; मृत अश्विनीच्या वडिलांचा संताप, जामीन रद्द करण्याची मागणी

Wednesday, 27 May 2026, 20:26

80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ‘बकुळा माळ’ हिसकावून चोरटे फरार; भोरमध्ये भरदिवसा चोरी

Wednesday, 27 May 2026, 20:12

देवाच्या दारात गुंडागर्दी! मंदिरातील पैसे घेण्यास विरोध केल्याने पुजाऱ्याचा तोडला दात; मांजरी बुद्रुक येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 20:04

अंगणात खेळत असताना 16 वर्षाच्या मुलावर चौघांकडून लोखंडी हत्याराने वार; हडपसर येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 19:55

भारताविरोधात मोठा कट उधळला! कराचीमार्गे गुजरातमध्ये पोहोचले जहाज; मध्यरात्रीच्या गुपित मिशनमध्ये मोठी कारवाई

Wednesday, 27 May 2026, 19:06
Next Post
Pune

Pune : पुणे पोलीस दलात मोठी खळबळ! आयुक्तांच्या पीआरओचं आंदेकर टोळीशी 'कनेक्शन'; थेट निलंबनाची कारवाई!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.