Chandrapur News : चंद्रपूर : काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर (वय-४८) यांचे आज मंगळवारी (ता.३०) रात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले. दोन दिवसापूर्वीच सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते. पिता-पुत्राच्या लागोपाठ मृत्यूमुळे धानोरकर कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. (Chandrapur Congress MP Balu Dhanorkar passed away; Father also passed away two days ago)
पिता-पुत्राच्या लागोपाठ मृत्यूमुळे धानोरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर
सुरेश धानोरकर हे किडनीसंबंधीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना एअर एम्ब्युलन्सने दिल्ली येथे हलवण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांची उपचारादरम्यान आज प्राणज्योत मालवली. (Chandrapur News) त्यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा, दोन मुले असा परिवार आहे. धानोरकर यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे दुपारी १.३० वाजता वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे, आज ३० मे रोजी दुपारी २ वाजेपासून ३१ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर ३१ मे रोजी वणी – वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
खासदार बाळू धानोरकर यांचा प्रवास
बाळू धानोरकर यांचे भद्रावती हे मूळ गाव आहे. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हाप्रमुख असा धडाकेबाज प्रवास त्यांनी लवकरच पूर्ण केला. (Chandrapur News) सन २०१४ पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला. परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली.
दरम्यान, फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या हजेरीनंतरही शिवसेना वाढविली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे काँग्रेसकडून चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपल्या संघटन कौशल्य आणि जनसंपर्काच्या बळावर त्यांनी विजय खेचून आणला होता. (Chandrapur News) आणि भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले. बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : एसटीच्या अधिकृत थांब्यावर 30 रुपयांत नाश्ता न मिळाल्यास कारवाई
Mumbai News : यापुढे बालवाडी, नर्सरी सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागणार