Chandrakant Patil पुणे : दलीत तरुण हा नोकरीबरोबरच ,उद्योग व्यवसायात पुढे येऊन आपले स्थान बळकट केले पाहिजे, त्यासाठी शासन म्हणून आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू . तसेच दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री (डिक्की) च्या माध्यमातून आपल्याला व्यवसाय कौशल्य व प्रशिक्षणासाठी योग्य ते सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले .
दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री (डिक्की) च्या संयोजनाने व उद्योजक मिलिंद कांबळे यांच्या प्रयत्नातून देशभरात स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून दलित युवकांसाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक घटक म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज पुण्यात डिझेल ,पेट्रोल टॅकरचे वितरण दलित युवकांना करण्यात आले.
हा वितरण समारंभ पालकमंत्री मा. ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडला.त्यावेळी ते बोलत होते . यावेळी पाटील यांनी झेंडा दाखवून उद्घाटन केले.तसेच निवड झालेल्या दलीत युवकांना पेट्रोल ,डिझेल टँकर च्या चाव्या देण्यात आल्या .
पाटील पुढे म्हणाले…
भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अतिशय उपयुक्त आणि रोजगार निर्माण करणारा आणि माणसाचे जीवन समृद्ध करणारा हा उपक्रम असून हेच खरे आंबेडकरांना व त्यांच्या विचारांना अभिवादन आहे.
कांबळे म्हणाले की ,देशभर केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या सहकार्याने विविध योजना दलित समाजासाठी चालू आहेत .त्याचाच एक भाग म्हणून आज टँकर वितरण केले जात आहे .यामध्ये 25 टक्के केंद्र सरकार व 15 टक्के राज्य सरकार यांचे या योजनेला अनुदान दिले जात आहे त्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार व्यक्त केले .देशभरात 3700 दलीत तरुणांना या योजनेचा लाभ डीक्की ने करून दिला आहे ..
डिक्कीचे महाराष्ट्र अध्यक्ष मुकुंद कमलाकर,भारतीय स्टेट बँकेचे आशुतोष कुमार ,संतोष कांबळे, सातारा समन्वयक प्रसन्ना भिसे, महिला समनव्यक सीमा कांबळे, अविनाश जगताप यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.