युनूस तांबोळी
शिरूर : कृषी व्यवस्थापन करत असताना शेतकऱ्याबाबत बाबत केंद्र सरकार व राज्य सरकार निष्क्रिय धोरणे राबवित आहे. परदेशात शेतमालाला बाजारभाव असताना निर्यातीचे धोरणांना चुकीच्या वाटा दाखविल्या जात आहे. त्यामुळे शेतमालाच्या उत्पादनाला खर्च वाढला आहे. त्यातून बाजारपेठेत मालाला उठाव नसल्याने बाजारभाव मिळत नाही. शेतकरी त्यातून बाजारातील लिलाव बंद करू लागले आहेत. यामुळे शेतमाल शेतात पडला असून शेतकरी कर्जात बुडू लागले आहे, अशी घणाघाती टिका माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केली.
जांबूत ( ता. शिरूर ) येथे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजुर झालेल्या विविध कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी, सरपंच दत्तात्रय जोरी, उपसरपंच राणी बोऱ्हाडे, माजी सरपंच बाळासाहेब फिरोदिया, बाळकृष्ण कड, माजी चेअरमन नाथा जोरी, उपाध्यक्ष भागा कोरडे ,सदस्य पोपट फिरोदिया, माजी चेअरमन बाळासाहेब बदर, माजी उपसरपंच शरद पळसकर, निवृत्ती जोरी, युवराज पळसकर, योगेश जोरी, मिलिंद थोरात, दादाभाऊ फलके, रामचंद्र जोरी आदी ग्रामस्थ उपस्थित होते
या वेळी आंबेगाव बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम म्हणाले की, कामे मंजुर होतात मात्र दर्जा उत्तम ठेवणे आवश्यक असुन निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मंजुर निधी वाया जातो. त्यामुळे ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांनी जागृत राहुन कामे चांगल्या दर्जाची करून घेणे गरजेचे आहे. या वेळी राजेंद्र गावडे यांनी या भागात मोठ्या प्रमानात निधी मंजुर करून माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील व खासदार अमोल कोल्हे यांनी दिल्या बददल आभार व्यक्त केले.