Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PM Modi News : भोसरीत ‘व्हीजन-२०२०’च्या स्वप्नपूर्तीचा आनंदोत्सव ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण अन्‌ भूमिपूजन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 1 August 2023, 19:07

PM Modi News : पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १ हजार ९७० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी मोशीतील ‘ वेस्ट टू एनर्जी’ आणि प्रधान मंत्री आवास योजना बोऱ्हाडेवाडी प्रकल्पावर प्रत्यक्ष आनंदोत्सव साजरा करण्यात आला.(PM Modi News)

‘वेस्ट टू एनर्जी’, ‘प्रधानमंत्री आवास’ प्रत्यक्षात साकारला – भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नांना यश.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्यामार्फत पंतप्रधान आवास योजना, वेस्ट टू एनर्जी अशा विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन शिवाजीनगर येथील पोलीस परेड ग्राउंडवर झालेल्या शानदार कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.(PM Modi News)

विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १ हजार ९७० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन झाले. यापैकी सुमारे १ हजार ७२० कोटी रुपयांचे प्रकल्प पिंपरी-चिंचवड शहरातील आहेत. त्यामुळे मोदींच्या दौऱ्यात भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रकल्पांचा बोलबाला दिसला.(PM Modi News)

‘व्हीजन- २०२०’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील कचऱ्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी ‘वेस्ट टू एनर्जी’ अर्थात कचऱ्यापासून वीजनिर्मिती हा प्रकल्प हाती घेतला होता. २०१८ मध्ये प्रकल्पाचे काम सुरू झाले. हा प्रकल्प आता कार्यान्वयीत झाला असून, त्याद्वारे प्रतिदिन १ हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया आणि १४ मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे समाविष्ट गाव मोशी आणि कचरा डेपो परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे ‘व्हीजन-२०२०’ मधील आश्वासनाची स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद स्थानिक नागरिकांनी प्रकल्पाच्या ठिकाणी केला.(PM Modi News)

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन बटन दाबून प्रकल्पाचे उद्घाटन केले. तर त्याचवेळी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी आनंद साजरा करण्यात आला. यावेळी कामगार नेते सचिन लांडगे, माजी नगरसेवक सागर गवळी, कुंदन गायकवाड, विकास डोळस, लक्ष्मण सस्ते, दिनेश यादव, संतोष मोरे, दत्ता गव्हाणे, विनायक मोरे, सागर हिंगणे यांच्यासह मोशी आणि पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

तसेच, बोऱ्हाडेवाडी येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रकल्पाअंतर्गत १२८८ घरांचा चावीवाटप कार्यक्रम झाला. यावेळी माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, नितीन बोऱ्हाडे, मंगेश हिंगणे यांच्यासह स्थानिक नागरिक आणि लाभार्थी उपस्थित होते.(PM Modi News)

याबाबत बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले कि, ‘व्हीजन-२०२०’ अंतर्गत हाती घेतलेला ‘वेस्ट टू एनर्जी’ आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रकल्प पूर्ण झाला. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाभार्थींना चावी वाटप झाले. तसेच, पिंपरी-चिंचवडचा कचरा प्रश्न सोडवण्यासाठी कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प हा सर्वोत्तम आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी कौतूक केले. ही निश्चितच पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब आहे. या कार्यक्रमाला स्वत: उपस्थित राहता आले, त्याचा अभिमान वाटतो. या पुढील काळात प्रस्तावित प्रकल्प पूर्णत्वास नेऊन शहराला नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रामाणिक काम करीत राहणार आहे.(PM Modi News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे, नाशिक, नागपूरसह अनेक भागात पावसाची शक्यता, जाणून घ्या, हवामान खात्याचा अंदाज

Sunday, 18 May 2025, 7:55

Today’s Horoscope: ‘या’ राशींना कामावर लक्ष देण्याची गरज, आळस केल्यास होणार नुकसान

Sunday, 18 May 2025, 7:39

आरोग्यासाठी फायदेशीर..! तूप खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

Saturday, 17 May 2025, 23:24

बस स्थानकात चोरट्यांचा प्रताप..! सोन्याचे कानातले चोरताना महिलेचा तुटला कान; प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण

Saturday, 17 May 2025, 22:58

संजय राऊतांच्या पुस्तकाला ‘नरकातला स्वर्ग’ हे नाव कोणी सूचवलं माहितीये? जाणून घ्या सविस्तर…

Saturday, 17 May 2025, 22:38

भयंकर..! साडेपाच वर्षाच्या मुलीचे अपहरण, ऊसाच्या शेतात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न, दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपीला अटक

Saturday, 17 May 2025, 21:00
Next Post

Pachagani News : भाडेकराराबाबतची माहिती नुमना फॉर्ममध्ये भरून पोलिस ठाण्यात द्यावी ; पाचगणी पोलिसांच्या सूचना

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.