पुणे : कसबा पोटनिवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी केली आहे. याबाबत बिचुकले यांनी माहिती देणारं पत्रही सादर केले आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, संपूर्ण निवडणूक अशी पैसे वाटून जे कॅमेरामध्ये दोषी सापडत आहेत. तरी तुम्ही त्यावर कारवाई करणार नसाल तर ही निवडणूक प्रक्रिया ठप्प करा आणि नव्याने निवडणूक घ्या. हे दोन्हींकडून सुरु आहे. कारण धंगेकरांवरही भाजपने आक्षेप घेतला आहे. याचे माझ्याकडे पुरावे नाहीत पण यावरही कायदेशीर पावले उचलने गरजेचे आहे.
काँग्रेसचेजे उमेदवार आहेत त्यांनी सकाळी आंदोलन केले, कारण त्यांच्या मते समोरच्या उमेदवारांकडून मतदारांना पैशांचे वाटप सुरु आहे. याचे व्हिडिओ त्यांच्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मी तिसरा उमेदवार म्हणून मलाही न्याय हक्काने लढणे हा माझा अधिकार आहे. या तक्रारींची दखल घेऊन त्याविरोधात निवडणूक आयोगाने संबंधितांवर कठोर कारवाई केली आहे का? असा सवालही त्यांनी विचारला.
निवडणूक आयोगाचा खूपच ढिसाळ कारभार आहे, म्हणून निवडणूक आयोगाला मी पत्र देतोय की, यामध्ये मी हेच म्हटलंय की, याविरोधात कायदेशीर कारवाईसाठी मी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज देण्यासाठी एकटाच आलो आहे. यावर यांची काय कारवाई होतेय याकडे माझे लक्ष असणार आहे.
दरम्यान, असे जर तुम्ही लोकांना आमिष देत असाल तर निवडणूक नियमांनुसार तो गुन्हा आहे, त्यामुळे त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. यामध्ये मी जरी मतदारांना कुठल्याही प्रकारचे आमिष देत असेल तर माझ्यावरही कारवाई करा, असंही त्यांनी म्हटले आहे.