पुणे : आपल्याशी काही जणांनी गद्दारी केली. मुख्यमंत्रीपदी ज्यांना पाहिजे होते, त्यांनी ते घेतले. ज्यांना सर्वकाही दिले. तेही गेले आपण काय बोललो नाही. मात्र, आता अति होत आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला. तसेच, या दोन्ही गटांना ‘शिवसेना’ हे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.