Breaking News : नवी दिल्ली : ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, मशाल चिन्हाच्या याचिकेवरची सुनावणी सहा आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा करत याचिका दाखल केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडणार होती. मात्र, समता पक्षाकडे पूर्ण कागदपत्र नसल्याने सुनावणी पुढे ढकलली गेली आहे.
समता पक्षाकडे पूर्ण कागदपत्र नसल्याने सुनावणी पुढे ढकलली
उद्धव ठाकरे यांच्या मागचे शुक्लकाष्ठ संपत नसल्याची स्थिती आहे. आधी पक्षात फूट पडली. नंतर शिंदे गटाने पक्षावर दावा केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडील चिन्हही गेलं.(Breaking News) सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. त्यात ठाकरे गटाला दिलासा मिळाला. पण शिंदे सरकार गेले नाही. उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिले. आता तेही त्यांच्या हातून जाणार की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. समता पार्टीने मशाल चिन्हावर दावा केला होता. आमच्या पक्षाचे चिन्ह दुसऱ्या पक्षाला कसे देऊ शकता? असा सवाल समता पार्टीने केला होता. समता पार्टीने हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात नेला. त्यावर आज सुनावणी झाली. समता पक्षाकडे पूर्ण कागदपत्र नसल्याने सुनावणी पुढे ढकलली आहे.
यापूर्वी मंडल यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. (Breaking News) पण कोर्टाने ती रद्दबातल ठरवली होती. त्यामुळे समता पार्टीने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. आता सर्वोच्च न्यायालय मशाल चिन्हावर काय निर्णय देते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मशाल हे चिन्ह समता पार्टीचे असले तरी समता पार्टीने अनेक वर्षांपासून हे चिन्ह वापरलेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून समता पार्टी निवडणुकीत उतरलेलाच नाही. (Breaking News) त्यामुळे हे चिन्ह त्यांना मिळेल की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. कोणत्याही पक्षाला चिन्ह देताना आणि ते काढून घेताना निवडणूक आयोग विचारपूर्वक निर्णय घेत असतो. ठाकरे गटाला मशाल चिन्ह देतानाही निवडणूक आयोगाने कायदेशीरबाबी पडताळूनच हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे आता कोर्टात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हेंची आमदारकी अडचणीत? ठाकरे गट आक्रमक
Breaking News : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकमेकांना व्हीप; काय म्हणाले अनिल पाटील?