Breaking News : मुंबई : काँग्रेसचे राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना दिल्ली विशेष न्यायालयाने दणका दिला आहे. कोळसा घोटाळा प्रकरणी या दोघांना चार वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. १३ जुलैला दिल्लीतल्या विशेष न्यायालयाने या प्रकरणात त्यांना दोषी ठरवलं होतं. आता या प्रकरणी विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
सीबीआय विशेष न्यायालयाने सुनावली शिक्षा
दिल्लीतील सीबीआय विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. जेएलडी यवतमाळ एनर्जीला चुकीच्या पद्दतीने खाणीचे कंत्राट मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. (Breaking News) यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याच प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन वरिष्ठ लोकसेवक केएस क्रोफा आणि केसी सामरिया यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
सीबीआयने या प्रकरणात २७ मार्च २०१३ रोजी आरोपपत्र दाखल केलं होतं. या आरोप पत्रात या सगळ्यांनी गैरमार्गाने कोळसा खाण आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. (Breaking News) या प्रकरणात सीबीआयने २० नोव्हेंबर २०१४ या दिवशी क्लोजर रिपोर्ट सादर केला. मात्र तो स्वीकारण्यास न्यायालयाने नकार दिला आणि प्रकरणाचा तपास सुरु ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणातल्या सर्वांना दिल्ली विशेष न्यायालयाने दोषी ठरवलं आणि त्यानंतर आता आज विजय दर्डांसह इतरांना शिक्षाही सुनावण्यात आली.
छत्तीसगडमधील कोळसा घोटाळा प्रकरणात अनेक मोठ्या नावांचा समावेश होता. या घोटाळ्यात राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्यांसह आयएएस अधिकारी देखील राजपूर तुरुंगात बंद आहेत. (Breaking News) याच्यामध्ये आयएएस अधिकारी समीर बिश्नोई, मुख्यमंत्र्यांचे उपसचिव सौम्या चौरसिया, कोळसा घोटाळ्यात सिंडीकेटची भूमिका बजावणारा सूर्यकांत तिवारी, सुनीर अग्रवाल यांचाही समावेश आहे.
मागील काही दिवसांपूर्वी या प्रकरणात माजी खासदार आणि ‘लोकमत’ माध्यम समूहाचे विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एचसी गुप्ता, केएस क्रोफा आणि के सी सामरिया या दोन अधिकाऱ्यांसह जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि तिचे संचालक मनोज कुमार जयस्वाल या सर्वांना न्यायालयाने दोषी ठरवले होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणांमध्ये विशेष न्यायालयाने काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डांसह सर्व आरोपींना दोषी ठरवले होते. (Breaking News) या आरोपींच्या शिक्षेवरील सुनावणी होणार होती. आयपीसी कलम १२० बी, ४२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली न्यायालयाने या सर्वांवर छत्तीसगडमधल्या फतेपूर खाणीचे कंत्राट जेएलडी यवतमाळ एनर्जीला चुकीच्या पद्धतीने मिळवल्याचा ठपका ठेवला होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : मोठी बातमी! अंधेरीत सोसायटीवर कोसळली दरड; झोपेत असतानाच प्रचंड आवाज झाला अन्…