Breaking News : मुंबई : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथविधी घेऊन ११ दिवस उलटले तरीही खातेवाटप रखडलं आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठका सुरु होत्या. खाते वाटप त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तार याबाबत बैठकीत सखोल चर्चा झाली. आता या चर्चांना पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक सुरू झाली आहे. तर राजभवनावरही अचानक पोलीस बंदोबस्त वाढल्याने हालचालींना वेग आला आहे. यामुळे आजच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यानंतर लवकरच खाते वाटपही केले जाणार आहे.
लवकरच खाते वाटपही केले जाणार
राजभवनाबाहेर अचानक पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढल्याने आज संध्याकाळी राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Breaking News) शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादीच्या एकूण ८ ते १० आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे. विदर्भातील सत्ताधारी पक्षातील ९० टक्के आमदार मुंबईत तळ ठोकून असल्याने या शक्यतांना अधिक बळ मिळत आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या देवगिरी या शासकीय बंगल्यावर दाखल झाले आहेत. सकाळपासून अजित पवारांचा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. (Breaking News) ते देवगिरीवरही नव्हते. त्यामुळे पडद्यामागे विस्तार आणि खातेवाटपाबाबत जोरदार हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे देखील उपस्थित आहेत. या बैठकीत खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, सोमवारपासून तीन आठवड्यांचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप करतील. मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप पावसाळी अधिवेशनापूर्वी होईल, असे वाटते, (Breaking News) असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. साताऱ्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीला देण्याबाबत विचारलं असता जो निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील तो आम्हाला मान्य असेल, असं ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या आमदारांचा अचानक सत्तेत शिरकाव आणि मंत्रिपदाची शपथ यामुळे शिवसेना आणि भाजपमधील जे आमदार मंत्रीपदासाठी इच्छुक होते, त्यांच्यामध्ये नाराजी होती. (Breaking News) पण आता हा तिढा सोडवण्यात यश आल्याचे समजत आहे. अनेक आमदार वेटिंगला आहेत. आता फक्त फोन यायचीच वाट पाहतोय, अशी प्रतिक्रीया ते व्यक्त करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : ‘त्या’ १२ आमदारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय