Breaking News : नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. विधानपरिषदेवर राज्यपालांनी नियुक्त करावयाच्या १२ आमदारांवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे आता १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शिंदे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
काय आहे शिंदे सरकारची प्रतिक्रीया…!
राज्यात सत्तेवर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली होती. मात्र, राज्यपालांनी या यादीवर निर्णय घेतला नव्हता. या प्रकरणी राज्य सरकारने न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतरही राज्यपालांनी निर्णय घेतला नव्हता. (Breaking News) दरम्यान, मागील वर्षी सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी यादी पाठवली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या स्थगितीवरील निर्णय अडकून पडला होता. आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने १२ आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली आहे.
याचिकाकर्ते रतन सोली यांनी याचिका मागे घेण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे सध्या तरी नियुक्तीवरील स्थगिती हटवण्यात येत आहे. (Breaking News) या प्रकरणात दुसरे याचिकाकर्ते सुनील मोदी यांना कोर्टात दाद मागायची असेल तर नवी याचिका करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आमदार नियुक्तीबाबत सरकारचा मार्ग तुर्तास तरी मोकळा झाला आहे.
दरम्यान, याप्रकरणी आजच याचिका दाखल करू, असे सुनील मोदी यांनी सांगितले आहे. पण कायदेशीर बाबी पाहता त्यांची शक्यता कमी आहे. जून २०२० मध्ये राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची घोषणा होणार होती. पण त्यावेळच्या राजकीय परिस्थितीत हा निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळेच रतन सोली यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. (Breaking News) त्यानंतर महायुतीचे सरकार राज्यात आले. आता काही काळासाठी का होईना, आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवण्यात आल्यामुळे शिंदे सरकारला दिलासा मिळाला आहे.
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : पुण्यातील नऱ्हे येथील भूमकर चौकाजवळ कोळशाच्या ट्रकचा टायर फुटल्याने पलटी