राहुलकुमार अवचट
(Breaking News ) दौंड, (पुणे) : शिवसेना खासदार संजय राऊत यांची दौंड येथे बुधवारी (ता. २६ एप्रिल) सभा होणार असल्याची माहिती दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी दिली भीमा-पाटस साखर कारखान्याच्या ५०० कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचारावर दौंड तालुक्यात खासदार संजय राऊत यांच्या सभेबाबत मोठी उत्सुकता होती.
याबाबत माजी आमदार रमेश थोरात, महानंदा दूध संघाच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी राऊत यांची त्यांच्या कार्यालयात मुंबई येथे भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांनी दौंड येथे २६ एप्रिल रोजी येण्याचे निश्चित केल्याचे थोरात यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार….!
मार्च महिन्यात मुंबई येथे राऊत यांनी दौंडमधील भीमा-पाटस साखर कारखान्यात ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत याची चौकशी करण्याची मागणी केली होती. याबाबत मी कागदपत्रे देतो, मला वेळ द्या, अशी लेखी मागणी खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. त्यांच्याकडून राऊत यांना कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, त्यांनी सीबीआयकडे तक्रार करण्याचे सांगत तसे बारामतीच्या पत्रकार परिषदेत सूतोवाच केले होते.
त्यांच्या या विधानाने दौंडमध्ये आमदार राहुल कुल आणि त्यांच्या सहकार्यांना मोठा धक्का बसला होता, तर माजी आ. रमेश थोरात यांच्या कार्यकर्त्यांना आनंद झाला होता. परिणामी, तालुक्यात आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांनी राऊत यांच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले होते. हा सर्व गोंधळ पाहून थोरात यांच्या समर्थकांची राऊत यांची सभा झाली पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार थोरात आणि नागवडे यांनी खासदार राऊत यांची भेट घेत या सभेसाठी २६ एप्रिल ही तारीख निश्चित केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Politics : उध्दव ठाकरे संतापले ! फडणवीसांना म्हणाले फडतूस राजकारण तापले
Politics News : सुषमा अंधारे शिरसाटांवर भडकल्या ; लेकीबाळींकडे बघण्याची त्यांची दृष्टी किती गलिच्छ