Breaking News पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि नेते शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. या घोषणेमुळे पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.
निर्णय मागे घेण्यासाठी भावनिक आवाहन…!
पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आपला निर्णय मागे घेण्यासाठी भावनिक आवाहन केले. पवारांनी राजीनामा दिल्याने पुण्यातील एका नेत्याने सुध्दा आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे.
शरद पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडेल, असे हे धक्कादायक खुलासे आहेत.
या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी अनेक आठवणी सांगितल्या. त्याचवेळी धक्कादायक निर्णय जाहीर केला. आपण अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भावनिक होताना राज्यभरात पाहायला मिळते आहे. शरद पवारांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपण शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं ट्विट करत माहिती दिली आहे.
“कितीही इच्छा झाली तरी किमान भक्तांच्या श्रद्धेसाठी देवाला देवपण सोडता येत नाही, अगदी तसंच पवार साहेबांनीही अध्यक्षपद सोडू नये. साहेबांनी आपली भूमिका न बदलल्यास माझ्यासह पुणे शहर कार्यकारणीतील तमाम सदस्य राजीनामा देत आहोत, जिथे आमचा देव नाही तिथे आमचा नमस्कारही नाही.”, अश्या आशयाचं ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Politics : मन की बात देशवासियांच्या मनातील कार्यक्रम : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
Politics : अजित पवारांना टार्गेट करून त्यांच्या विश्वासार्हतेवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले
Politics : अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार का?, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या..