Breaking News पुणे : भीमा पाटस साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. त्यानंतर कोणतीही चौकशी झाली नसल्याने संजय राऊतांनी CBI कडे तक्रार केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
कारखान्याच्या खात्यात असलेले 500 कोटी रुपये कारखान्या व्यतिरिक्त बाहेरच्या कामांसाठी, खासगी कामांसाठी वापरले आहेत. असा आरोप राऊतांनी केला आहे. तसेच
गृहमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याने आपण सीबीआयकडे तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले.
भीमा सहकारी कारखान्याचे चेअरमन भाजपचे आमदार राहुल कुल आहेत. माझ्याकडे 17 कारखान्याचे कागदपत्रे आहेत. त्यापैकी राहुल कुल यांचा एक कारखाना आहे. संजय राऊतांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलतानाही भीमा पाटस साखर कारखान्याविरोधात आरोप केले होते. तसेच, यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र गृहमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सीबीआयकडे तक्रार दाखल केली असे राऊतांनी सांगितले.
तब्बल 500 कोटींचा घोटाळा…!
या कारखान्यात तब्बल 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, भीमा पाटस कारखाना भाजप आमदार राहुल कुल यांच्या मालकीचा आहे. गृहमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यानं आपण सीबीआयकडे तक्रार केल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे.