Breaking News : मुंबई : शिवसेना ठाकरे गटातून आऊटगोईंग सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. कायंदे यांच्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेकडून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, आज पावसाळीअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नीलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांना अपात्र करावे, अशी जोरदार मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. यामुळे दोघीही अडचणीत सापडल्याची चर्चा होत आहे.
विधीमंडळ सचिवांना पत्र!
पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी नीलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. (Breaking News) नीलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांना अपात्र करण्यात यावं अशी मागणी करत ठाकरे गटाकडून विधानभवन सचिवांना पत्र देण्यात आलं आहे. आता या पत्राला पुढील चौदा दिवसांच्या आत गोऱ्हे आणि कायंदे यांना उत्तर द्यावं लागणार आहे.
दरम्यान, विरोधक आक्रमक झाल्याने पहिल्याच दिवशी अर्ध्या तासानंतर अधिवेशन तहकूब करावे लागले. (Breaking News) काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून विधान भवनाच्या पायऱ्यावर जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार सहभागी न झाल्याने चर्चेला उधाण आले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकमेकांना व्हीप; काय म्हणाले अनिल पाटील?