महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुका झाल्या तर जनतेचा कौल कोणाला? सर्वेक्षणातून समोर आली महत्त्वपूर्ण माहिती…
Breaking News : मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा मुद्दा राज्यापुरता नाहीतर राज्याबाहेरही चर्चेत होता. शिवसेना पक्षफुटीनंतर महाराष्ट्रातील राजकारण नव्या वळणावर गेले आहे. त्यात नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यामुळे जर महाराष्ट्रात आजघडीला विधानसभा निवडणुका झाल्या तर जनतेचा कौल कोणाला असेल, याचं चित्र एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
कोणाला मिळणार किती जागा?
राज्यात आज निवडणुका झाल्या तर भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या युतीला बहुमत मिळताना दिसत आहे. या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात सध्या सत्ताधारी असणाऱ्या भाजप आणि शिंदे गटाला 165 ते 185 जागा मिळण्याचा अंदाज आहे. (Breaking News) तर दुसरीकडे, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीला 88 ते 118 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दोन ते पाच जागा मिळू शकतात. तर इतर पक्षांना 12 ते 22 जागा मिळताना दिसत आहेत.
भाजपला 121 तर शिंदेंच्या शिवसेनेला 44 जागा
भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज जरी असला तरी भाजपला 121 ते 131 जागा मिळू शकतात. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 44 ते 54 जागा मिळू शकतात. (Breaking News) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 8 ते 18 जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला 41 ते 51 तर काँग्रेसला 39 ते 49 जागा मिळू शकतात. मनसेला दोन ते पाच जागा मिळू शकतात. इतरांना 12 ते 22 जागा मिळू शकतात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाय ठेवू न देण्याचा इशारा ; वाद चिघळणार??