Breaking News : पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसेंदिवस नवनवीन समीकरणे उदयास येत असतानाच निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकीसाठी लगबग सुरू केली आहे. मागील जवळपास २ वर्षांपासून रखडलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने एक जीआर काढला असून, यामध्ये मतदार यादीसंदर्भात महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका यासाठी मतदार याद्या अंतिम करण्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने या राजपत्रात म्हटले आहे.त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मोठ्या घडामोडी दिसून येणार
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यापूर्वी करोनामुळे, त्यानंतर ओबीसी राजकीय आरक्षणामुळे आणि राज्यातील सत्तांतरामुळे रखडल्या होत्या. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग सुकर झाला होता. मात्र, त्यापूर्वी ९२ नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. (Breaking News) दरम्यान, या ९२ नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्येही हेच आरक्षण लागू करावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या काळात तयार करण्यात आलेली महापालिकेची वॉर्डरचना बदलण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने घेतला होता. शिंदे सरकारच्या या निर्णयाला सुद्धा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन दाखवा, असे भाजपला आव्हान दिले आहे.(Breaking News) तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका प्रलंबित असल्याचे म्हटले होते. आता सर्वच समीकरणे बदलत आहेत. अजित पवार यांचा राष्ट्रवादीतील एक गट सत्तेत सहभागी झाल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मोठ्या घडामोडी दिसून येणार आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. (Breaking News) त्यामुळे अनेक इच्छुक लगबगीने तयारी सुरु करतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मोठ्या घडामोडी दिसून येणार हे नक्की.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : पंकजा मुंडेंची आज पत्रकार परिषद; मोठी घोषणा करणार?