मुंबई : काँग्रेस अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांची आज बुधवारी (ता.१९) निवड झाली आहे. खर्गे यांनी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेस खासदार शशी थरूर यांना पराभव केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशभर चर्चेत असलेली काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना ७ हजार ८९७ मते मिळाली आहे. तर त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेस खासदार शशी थरूर यांना १ हजार ७२ मते मिळाली आहेत. या निवडणुकीत ४०० हून जास्त मते बाद झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर शशी थरूर यांनी ट्वीट करून मल्लिकार्जुन खर्गे यांचे अभिनंदन केले. तसेच “काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनने ही एक मोठी सन्मानाची बाब आहे. पण त्यासोबतच ती एक मोठी जबाबदारीही आहे. माझी इच्छा आहे की मल्लिकार्जुन खर्गेंना यामध्ये यश मिळावे. मला मत देणाऱ्या एक हजाराहून अधिक काँग्रेस जनांचे मी आभार मानतो”, असे ट्वीटमध्ये शशी थरूर म्हणाले आहेत.