Breaking News मुंबई : उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असून मुख्यमंत्री बदलणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यामुळे राजकारणात चांगलीच चर्चा रंगली होती. आता पुन्हा एक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
सध्या राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदांची अदलाबदल करावी, अशी भाजपची इच्छा असल्याचे बातमी समोर येत येत आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि प्रवक्ते क्लाईड क्रास्ट्रो यांनी एक ट्वीट करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
क्लाईड क्रास्ट्रो यांनी ट्वीट करून म्हटले…!
“हे पण खरं आहे का???श्री. @mieknathshinde (एकनाथ शिंदे) यांनी कामावरून तीन दिवसांची सुट्टी घेतल्याची बातमी आहे. मीडियातील सूत्रांचे म्हणणे आहे की, त्यांनी नाराज होऊन सुट्टी घेतली आहे. कारण @BJP4India (भाजप) ची इच्छा आहे की त्यांनी श्री. @Dev_Fadnavis (देवेंद्र फडणवीस) यांच्यासोबत सरकारमध्ये आपल्या पदाची अदलाबदल करावी.”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी 3 दिवसांची सुट्टी घेतल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पदाची अदलाबदल होणार म्हणून नाराज मुख्यमंत्र्यांनी सुट्टी घेतली का? असा सवाल करण्यात आला आहे. दरम्यान राज्याच्या राजकारणात एकीकडे या उलट सुलट चर्चा सुरु असताना भाजपचे राज्यातील वरिष्ठ नेते कर्नाटकात आहेत. तेथील निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे कर्नाटकमध्ये गेले आहेत.