Breaking News : मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आमदारांच्या गुणपत्रकाची तपासणी घेण्यास सुरवात केली आहे. भाजप सर्व आमदारांना थेट त्यांचे रिपोर्ट कार्डच देणार आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर भाजपमध्ये फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारभारत कच्चे असणाऱ्या आमदारांची कान उघाडणी केली जाणार आहे, तर ‘ढ’ आमदारांना भाजपकडून नारळ दिला जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर भाजपमध्ये फेरबदल होण्याची शक्यता
भाजपने सर्व आमदारांना येत्या १८ ऑगस्ट रोजी मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात बैठक होणार आहे. (Breaking News) या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत भाजप १०६ आमदारांच्या हाती त्यांचे ‘गुणपत्रक’ ठेवणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, या बैठकीत भाजपच्या प्रत्येक आमदाराच्या कामगिरीवर चर्चा होणार आहे. आमदारांच्या मतदारसंघातील सर्वेक्षणात कोण कुठे आहे, हे यातून दिसणार आहे. (Breaking News) आमदारांच्या गेल्या ४ वर्षांतील कारकिर्दीवरून हे गुणपत्रक तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गुणपत्रक हाती आल्यानंतर नापास आमदारांना रेड ॲलर्ट दिला जाणार आहे. परिस्थिती न सुधारल्यास पर्यायी उमेदवारांनाही कामाला लागण्याच्या सूचना दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. आमदारांना मतदारसंघात कामे करण्यास सांगितले जात आहे. (Breaking News) नागरिकांच्या समस्या सोडवतानाच मतदारसंघ बांधणीवरही लक्ष देण्यास सांगितले जात आहे. पुन्हा सत्ता आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. राज्यातील १४५ जागांवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप कामाला लागली आहे.