Breaking News | मुंबई : राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार हे महाविकास आघाडीवर नाराज आहेत, तसेच ते पक्षावर देखील नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे अजित पवार हे भाजप सोबत जातील अशी चर्चा रंगली आहे. यातच पिंपरीतील एका राष्ट्रवादीच्या आमदाराने साडे अकरा पर्यंत थांबा काय घडत ते पाहा, असा सुचक इशाराही दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारण पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार का ? अशा चर्चांना उधाण आले आहे.
आमदारांच्या संमती सह्या मिळाल्याने वेग…
दरम्यान, राजकीय वर्तुळातून खळबळजनक एक माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या प्रयत्नांना त्यांच्या पक्षातील आमदारांच्या संमती सह्या मिळाल्याने वेग आला आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी संमतीच्या स्वाक्षऱ्या दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित आमदारांची यादी योग्यवेळी राज्यपालांकडे सादर करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. राष्ट्रवादीकडे सध्या स्थितीला 53 आमदार आहे. तर पक्षांतर बंदी कायद्याच्या नियमानुसार वेगळा गट स्थापन करण्यासाठी 36 आमदारांची गरज आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहे. राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्या असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह राज्याच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करणाऱ्या सेनेच्या खासदारांना सर्वोच्च न्यायालय अपात्र ठरवेल, असे गृहीत धरून अजित पवार यांच्याकडून ही खेळी खेळवली जात असल्याचे दिसते आहे. मात्र, या सर्वावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खडखडीत मौन आहे.