Breaking News : पुणे : कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना आज सकाळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यापाठोपाठ शिंदे सरकारमधील आणखी दोन मंत्र्यांना धमकीचा फोन आला आहे. आरोपीने पोलिसांच्या चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, फक्त छगन भुजबळच नाही तर आणखी बडे नेते रडारवर होते. अजित पवार, धनंजय मुंडे यांनाही जीवे मारण्याचा धमक्या दिल्या होत्या, असे त्याने म्हटले आहे. धनंजय मुंडे यांच्या परळीच्या घरी धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. या धमकीच्या फोनमध्ये लाखो रुपयांची मागणीही करण्यात आली आहे.
अजित पवार, धनंजय मुंडे यांनाही जीवे मारण्याचा धमक्या दिल्या होत्या
दरम्यान, छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तर भुजबळ यांच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. (Breaking News) भुजबळ यांना धमकी देणाऱ्याची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यावेळी आरोपीने आणखी दोन नेते रडारवर असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांना फोनवरून धमकावल्याचे प्रकरण समोर आले आहे. या फोनवरून मुंडे यांना धमकी देण्याबरोबरच पैशांचीही मागणी करण्यात आली आहे. (Breaking News) ५० लाख रूपये तातडीने द्या, अन्यथा जीवे मारीन असे फोनवर सांगण्यात आले. मुंडे यांना धमकीचा फोन आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळपासून राज्याच्या राजकारणात धमकीच्या फोनची चर्चा सुरू आहे.
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत जाणाऱ्या नेत्यांमध्ये धनंजय मुंडे यांचे नाव आघाडीवर होते. अजित पवार यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा मुंडे यांनी आपल्या भाषणातून वाचला होता. (Breaking News) त्यानंतर आज धनंजय मुंडे यांना थेट धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे.
दरम्यान, मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांनी महाडमधून ताब्यात घेतले आहे. (Breaking News) धमकी देणाऱ्या व्यक्तीनं नाव प्रशांत पाटील असून, तो कोल्हापूरच्या चंदगड येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रशांत पाटीलने मंत्री छगन भुजबळांना धमकी दिल्याचे निष्पन्न झाले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : ‘त्या’ १२ आमदारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय