नवीन नगरपालिका करण्याचे आदेश येत्या १५ दिवसात : माजी मंत्री शिवतरे यांच्या पाठपुराव्याला यश…!
मुंबई : उरुळी देवाची व फुरसुंगी ही पुणे महानगरपालिकेतील समाविष्ट करण्यात आलेली गावे पुन्हा पालिकेतून वगळून या दोन्ही गावांची एकत्रित नगरपालिका करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर दिले. या संदर्भातील तांत्रिक आदेश येत्या दोन आठवड्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
सन २०१७ मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये ११ गावांचा समावेश करण्यात आला होता. यात या दोन्ही गावांचा देखील समावेश करण्यात झाला होता. या गावांसह ११ गावांच्या विकास आराखड्याचे काम महानगरपालिकेने हाती घेतले असताना पूर्णत्वापर्यंत आले होते. तसेच या गावांमध्ये तीन टीपी स्कीम देखील राबविण्यात येत होती. पालिकेत समावेश झाल्यानंतर या गावांची मिळकतकर आकारणी देखील सुरु करण्यात आली होती. गावामध्ये कोणत्याही पायाभूत सुविधाची पूर्तता न करता मोठ्या प्रमाणात कर आकारणी होत असल्याने अनेक स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या.
महानगरपालिका कोणत्याही सुविधा देत नसल्याने समाविष्ट गावांची स्वत्रंत महानगरपालिका करावी यासाठी सत्ता बदलानंतर माजी मंत्री विजय शिवतारे यासाठी प्रयत्न करत होते. सातत्याने पाठपुरावा करण्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आज मुंबई येथे बैठक घेत निर्णय घेतला.
या बैठकीत उरुळी देवाची व फुरसुंगी ही दोन्ही गावे पालिका हद्दीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही गावकनही लोकसंख्या सिमारे २ लाखांच्या आसपास असून गतीने विकासकामे सुरु आहेत. दोन्ही गावे वगळून नवीन नगरपालिका करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले असल्याची माहिती पालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिली. या बैठकीला माजी मंत्री विजय शिवतारे, याच्याबरोबर नगरविकासचे अप्पर सचिव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पालिका आयुक्त विक्रम कुमार, मिळकत कर विभागाचे प्रमुख अजित देशमुख उपस्थित होते.