Breaking मुंबई : राष्ट्रावादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्यास आताही आवडेल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीतून अजित पवार बाहेर पडून भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चा देखील रंगल्या. मात्र जीवात जीव असे पर्यंत राष्ट्रवादीत राहणार असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. मात्र आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठे विधान केल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या भविष्यावर वक्तव्य करत येत्या 2024 मध्ये आघाडी म्हणून लढू की नाही हे आताच कसं सांगू ? वक्तव्य केले होते. मात्र आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचं म्हणत चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठे विधान केले आहे.
महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याची आमची इच्छा…!
भविष्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याची आमची इच्छा आहे. परंतु आघाडी न झाल्यास तर आमचे सर्व प्लॅन तयार आहेत, असे पटोले यांनी जाहीर केले आहे. टिव्ही९ मराठीने हे याबाबतची बातमी प्रसिध्द केली आहे.
दरम्यान, अजित पवार यांचे पुण्यात लागलेल्या भावी मुख्यमंत्री बॅनर्सवर देखील पटोले यांनी भाष्य केल आहे. आज निवडणुका नाहीत, त्यामुळे मुख्यमंत्रीदावर चर्चा करण्याचं कारण नाही. ज्यांचे आमदार सर्वाधिक निवडून येतील त्यांचाच मुख्यमंत्री होईल, असं नाना पटोले म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Politics : अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार का?, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या..