Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ग्रंथ चळवळ महत्वाची : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 15 November 2022, 20:26

पुणे : “समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ग्रंथ चळवळ महत्वाची आहे. ग्रंथात संपूर्ण जीवन बदलण्याची क्षमता असल्याने डिजीटल क्रांतीच्या युगातही नवे ज्ञान संपादन करून व्यक्तिमत्व विकसीत करण्यासाठी ग्रंथ वाचन गरजेचे आहे”, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घोले रोड येथील पंडीत जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवनात आयोजित ‘पुणे जिल्हा ग्रंथोत्सव २०२२’ तसेच ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे होते.

यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, शासकीय विभागीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल सुरेश रिद्धीवाडे, सहायक ग्रंथालय संचालक अर्चना काळे, कवी विसुभाऊ बापट, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक सोपानराव पवार, तहसीलदार राधिका हावळ-बारटक्के, खेड तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हनुमंत देवकर आदी उपस्थित होते.

 

डॉ. देशमुख म्हणाले, “ग्रंथ हेच खऱ्या अर्थाने ज्ञानाचे वाहक आहेत. पुण्याच्या सांस्कृतिक विकासात ग्रंथ चळवळीचे मोठे योगदान आहे. एखाद्या गोष्टीकडे तंत्रशुद्ध पद्धतीने, चिकित्सक वृत्तीने बघण्याचे ज्ञान ग्रंथामधून मिळते. आजच्या स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी ग्रंथ वाचनाशिवाय पर्याय नाही. ग्रंथोत्सवामुळे वाचन संस्कृती विकसित होण्याबरोबरच ग्रंथाविषयी रुची निर्माण होण्यास मदत होईल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 डिजीटल वातावरणातही पुस्तकांचा स्पर्श प्रेरक : भारत सासणे
“डिजीटल साधनांकडे नव्या पिढीचा कल वाढत असताना अशा वातावरणातही पुस्तकांचा स्पर्श आणि त्याच्याशी असलेली मैत्री प्रेरक आहे. अनेक समस्यांवर मात करण्याची शक्ती त्यातून प्राप्त होते. पुस्तक वाचनाने मिळणारा आनंद विलक्षण असतो. जीवनाच्या विविध टप्प्यांवर मार्गदर्शन करण्याचे कार्य ग्रंथ करीत असतात. ग्रंथ हे आपले गुरु आणि त्याबरोबरच मित्र आहेत. ते आपल्याला मित्रत्वाच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत असतात. म्हणूनच पुस्तकांना केंद्रबिंदू ठेऊन जगभरात वाचन संस्कृतीच्या विकासासाठी प्रयत्न होत आहेत.” असे कार्यक्रमाचे अध्यक्ष सासणे म्हणाले.

प्रास्ताविकात श्रीमती गोखले म्हणाल्या, “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि ग्रंथालय कार्यालयाच्या स्थापनेचे रौप्य महोत्सवी वर्षाचा दुहेरी संगम आणि ग्रामीण व शहरी भागात वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी तसेच त्याची जोपासना होण्यासाठी ग्रंथ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.”

दुपारच्या सत्रात सुनीलकुमार लवटे यांचे सार्वजनिक ग्रंथालयांची उर्जित अवस्था, श्रीमती गौरी लागू यांचे जी एं च्या कथांचे अभिवाचन आणि विसुभाऊ बापट यांचे कुटुंब रंगले काव्यात हे कार्यक्रम पार पडले. पूजा दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले, तर ग्रंथालय निरीक्षक श्रीकांत संगेपांग यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाचा शुभारंभ
पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांच्या हस्ते मनपा भवन येथून ग्रंथ दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. बालगंधर्व मंदीर चौक मार्गे पुढे पंडीत जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन, घोले मार्ग, शिवाजीनगर येथे या ग्रंथदिंडीचा समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे सर्व संचालक, विविध तालुक्यातील ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह बाजीराव रोड येथील नूतन मराठी महाविद्यालय आणि गुरुवार पेठ येथील सेंट हिल्डाज् माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 उद्या (बुधवार) पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप :-
जिल्हा ग्रंथोत्सवाचा समारोप बुधवारी सायंकाळी ४ वाजता पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. सकाळच्या सत्रात ११.३० वाजता ऋचा थत्ते यांचा ‘सुचलेलं काही…वेचलेलं काही’ हा कार्यक्रम होणार आहे. तर अर्पणा निरगुडे आणि अजित कुंटे यांचे कथाकथन होईल. तसेच बालप्रवचनकार हभप. चैतन्यमहाराज थोरात यांचे दुपारी ३ वाजता ग्रंथविषयी प्रवचन होणार आहे. ग्रंथ प्रदर्शन व विक्री बुधवार १६ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत सुरू राहणार असून यात विविध विषयांच्या पुस्तकांसोबतच शासकीय प्रकाशनेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16
Next Post

नागझरी ग्रामस्थांचे अनुदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.