अजित जगताप
वडूज : भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वडूज ता खटाव येथे भाजपचे माण-खटावचे कार्यसम्राट आ. जयकुमार गोरेंच्या आदेशानुसार सेवा पंधरवडा रक्तदान शिबीर संपन्न झाले, यावेळी खटाव तालुक्यातील तरसवाडी ते डिस्कळ पर्यतच्या विविध क्रीडा मंडळ, सार्वजनिक उत्सव व भाजप कार्यकर्त्यानी उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.
अक्षय ब्लड बँकेच्या वतीने डॉ रुपाली मोरे, प्रकाश कानुरे, श्वेता वायदंडे, मंजुषा मोहिते, ज्ञानेश्वर बाटे, मयुरा कुपवाडे, शिध्राप्पा मुगली, मनाली वांडरे,शिवम काटकर, अजय सदामते, अली पकाली यांनी रक्तदात्यांच्या रक्ताच्या बॅगेचे संकलन केले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ. दिलीप येळ गावकर,भाजप खटाव तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण,अनिल माळी, वडूज शहराध्यक्ष प्रदीप शेटे, आर. पी. आय. जिल्हा उपाध्यक्ष कृणाल गडांकुश,जेष्ठ कार्यकर्ते शशिकांत पाटोळे,सचिन माळी,चंद्रकांत कोकाटे,सॊमनाथ भोसले,बनाजी पाटोळे,गणेश चव्हाण, विशाल बागल, प्रा. सदाशिव खाडे,दादा धोंडी जगताप व भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी तसेच तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खटाव पंचायत समितीच्या बचत भवनात झालेल्या रक्तदान शिबिरात पाचशे रक्तदात्यांचे नियोजन करण्यात आले होते अशी माहिती भाजप पदाधिकारी यांनी दिली होती. दुपारपर्यंत सुमारे शंभर रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडले आहे.यामध्ये चैताली देवकर, माधुरी माने सह विद्यार्थी व युवतींचाही रक्तदान शिबिरात सहभाग लक्षणीय दिसून आला.
रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास प्रोत्साहनपर टी शर्ट व पुष्पगुच्छ,चहा पान- करून आदरपूर्वक सत्कार करण्यात आला. सकाळी साडे नऊ ते चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिरात रक्तदान करण्यासाठी रक्तदात्यांनी गर्दी केली होती. यावेळी काहींना अशक्तपणा व अतिश्रमाने चक्कर आली होती. त्यांची भाजप कार्यकर्त्यानी मनापासून काळजी घेतली तसेच त्यांच्या उत्साहाला सलाम केला. खटाव तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण म्हणाले, आ जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
सर्वांनी भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल श्री चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले. आ.जयकुमार गोरे हे या रक्तदान शिबिराला भेट देणार असल्याचे फलक व माहिती भाजपच्या वतीने देण्यात आली पण, दुपारी तीन वाजले तरी रक्तदान शिबिराकडे ते फिरकले नाहीत. त्यामुळे युवक वर्गाची काही अंशी निराशा झाली असली तरी लवकरच आ.जयकुमार गोरे हे वडूज नगरीत येऊन सर्वांचे आभार मानतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.दरम्यान, स्वतः नगरसेवक यांनी ही रक्तदान करून कर्तव्य बजावले त्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे आभार मानले.यावेळी खटाव पंचायत समितीचे कर्मचारी तुकाराम खाडे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापून त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या.