दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराविरोधात राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष महिला आघाडी मोर्चा पुणे जिल्हा कार्यकारणी सदस्या शितल साबळे यांनी अंथुर्णे येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
ग्रामपंचायत अंथुर्णे हद्दीतील वालचंद पोलीस स्टेशन जुने व नव्याच्या मधील जमिनीवर कोणतेही अतिक्रमण नसताना घरे, झोपडी बांधले नसताना ग्रामपंचायत अंथुर्णे दप्तरी नोंदी लावून अतिक्रमित जागा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ग्रामपंचायतीचा चाललेला हा प्रकार लक्षात येतात भाजप महिला आघाडीच्या शितल साबळे यांनी अंथुर्णे ग्रामपंचायतच्या विरोधात उपोषण सुरु केले आहे.
या उपोषणास अनेक सामाजिक संस्था संघटनांचा जाहीर पाठिंबा मिळत आहे. लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली ही ग्रामपंचायत चुकीच्या गोष्टी करीत असल्याने आणि वेळोवेळी पाठपुरावा करून देखील यामध्ये सुधारणा होत नसल्याने आपण उपोषणाचा मार्ग निवडला असल्याचे भारतीय जनता पक्ष महिला आघाडी मोर्चा पुणे जिल्हा कार्यकारणी सदस्या शितल साबळे यांनी सांगितले.