पुणे : पंतप्रधान मोदी यांनी गरीब, शेतकरी, मध्यमवर्गीयांचे सक्षमीकरण व देशाची जलद प्रगती सुनिश्चित करण्यासाठी ठोस पाऊले उचलत आहेत. त्यांनी राबिविलेल्या हार घर पाणी, गॅस, वीज, स्वच्छतेचा कार्यक्रम भेदभाव ना करता यशस्वी योत आहे. मोदी सरकारच्या योजना प्रत्येक घटकापर्यंत पोचावा. बारामतीत २०२४ साली आपलाच खासदार होईल, जो भाजपचा पंतप्रधान बनविण्यासाठी मदत करेल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी व्यक्त केला.
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुन्हा एकदा बारामती दौऱ्यावर येणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर आज केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी बारामती दौरा करताना येथील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
महाराष्ट्रातील मागिल अडीच वर्षे ज्यांचे सरकार होते, त्यांनी विकास कामात सातत्याने राजकारण आणले आणि जनतेवर अन्याय केला. असा आरोप देखील पटेल यांनी केला.
यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी मंत्री राम शिंदे, बाळासाहेब गावडे, पुथ्वीराज जाचक,रंजन तावरे, दिलीप खैरे, अविनाश मोटे, युवराज तावरे, पांडुरंग कचरे, सतिश फाळके आदी पदाधिकारी उपस्थित होते.