पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने आणि श्रीमती अश्विनी जगताप यांनी सोमवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांसह उपस्थित मान्यवरांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले.
तसेच भाजपा व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विशाल रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन केले.
यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, शैलेश टिळक, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नाना भानगिरे, प्रदेश सचिव किरण साळी, संपर्क प्रमुख अजय भोसले, रिपब्लिकन पक्षाचे डॉ. सिद्धार्थ धेंडे, शैलेंद्र चव्हाण, मंदार जोशी, शिवसंग्रामचे भारत लगड यांच्यासह भाजपा आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.