लोणी काळभोर, (पुणे) : महिला सर्व क्षेत्रांत कशा आघाडीवर आहेत. स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी आजही जन्माला येणाऱ्या मुला-मुलींचे स्वागत शहरी व ग्रामीण भागांत वेगवेगळ्या पद्धतीने होते हे नाकारता येणार नसल्याचे मत लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर यांनी केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत रामा कृषी रसायन यांच्या सौजन्याने व ग्रामपंचायत लोणी काळभोर यांच्या वतीने मोफत आरोग्य तपसणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच काळभोर बोलत होत्या.
यावेळी व्ही. के. पांडे (मुख्य व्यवस्थापक रामा कृषी कंपनी), आर.एन. शर्मा विभागप्रमुख (रामा कृषी कंपनी), व्यवस्थापक एस. बी. कुंजीर, साधना बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्या सुनंदाताई शेलार, माजी उपसभापती सनी काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, उपसरपंच भारती काळभोर, माजी उपसरपंच ज्योती काळभोर, ललिता काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, सविता लांडगे, प्रियांका काळभोर, संगीता काळभोर, बकुळा केसकर, भाजपा शहराध्यक्ष कमलेश काळभोर, युनियन लिडर राजू काळभोर, महिला ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कर्मचारी वृंदव रामा कृषी कंपनी कर्मचारी उपस्थित होते.
यापुढे बोलताना काळभोर म्हणाल्या, “मुलगी म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा तिला पोषक आहार कसा देता येईल, तिचे आरोग्य चांगले राहावे. तसेच मुलीच्या जन्माचे स्वागत या उपक्रमांतर्गत मुलीचे महत्त्व पटवून देताना तिच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढे ही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.”
दरम्यान, विश्वराज हॉस्पिटलचे व हिलिंग हॅन्डस फाऊंडेशनचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमासाठी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश खुळपे यांनी केले तर आभार नागेश काळभोर यांनी मानले.