Big News : पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. राज्यातील बदललेल्या सत्ता समीकरणांचा परिणाम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर देखील झाला आहे. नुकतीच राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील समीकरणे बदलणार आहेत. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री कोण, यावरूनही चर्चा सुरू झाली होती. २००४ ते २०१४ या आघाडी सरकारच्या कालवधीत विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हे पद होते.(Big News) तर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर देखील अजित पवार यांच्याकडेच हे पद आले होते. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी आली. त्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांना दिले जाईल, अशी चर्चा सुरू झाली होती. आज अखेर या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.
राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी
* पुणे- अजित पवार
* अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
* सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
* अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
* भंडारा- विजयकुमार गावित
* बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
* कोल्हापूर- हसन मुश्रीफ
* गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
* बीड- धनंजय मुंडे
* परभणी- संजय बनसोडे
* नंदूरबार- अनिल भा. पाटील
* वर्धा – सुधीर मुनगंटीवार
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच दोन कोटींचे अमली पदार्थ जप्त