Big Breaking : मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आपल्याला पक्षातील सर्व सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. या घटनेचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. अजित पवार आणि त्यांच्यासह गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का? यावर सध्या तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बंडाच्या एक दिवस आधी, म्हणजेच १ जुलै रोजी लिहिलेले एक पत्र समोर आले असून, त्यामुळे अजित पवार गट अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रीतसर प्रक्रिया सुरू करण्यासाठी विधानसभाध्यक्षांकडे वेळ मागितला
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी (ता. २) संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, पक्षाविरोधात जाऊन अजित पवार यांनी केलेली कृती चुकीची असल्याचे नमूद केले. (Big Breaking ) या पार्श्वभूमीवर या नऊ जणांवर कारवाईची प्रक्रिया पक्षाकडून सुरू करण्यात आली असून, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे ही रीतसर प्रक्रिया सुरू करण्यासाठी वेळ मागितल्याचंही जयंत पाटलांनी नमूद केलं आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी रात्री केलेल्या एका द्वीटमध्ये दोन पत्र पोस्ट करण्यात आली आहेत. यातलं एक पत्र २ जुलै अर्थात बंडखोरी झाली त्यादिवशीच जारी करण्यात आलं आहे. या पत्रामध्ये विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची निवड करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. हे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयात देण्यात आलं असून, त्यावर राहुल नार्वेकरांच्या कार्यालयाची पोहोच नोंदही आहे.
या ट्वीटमधल्या दुसऱ्या पत्रावर १ जुलै २०२३ ही तारीख असून त्यामध्ये विधानसभेच्या प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आल्याचा उल्लेख आहे. तसेच, विधानसभा अध्यक्षांना यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्याची विनंतीही पत्रात करण्यात आली आहे. (Big Breaking ) या पत्रावरही राहुल नार्वेकरांच्या कार्यालयाची पोहोच नोंद आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही पत्रांवर २ जुलै अर्थात बंड झालं त्या दिवशी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारासची पोहोच नोंद आहे.
एकीकडे २ जुलै रोजी बंड झालेलं असताना दुसरीकडे त्याच्या एक दिवस आधीच पक्षाच्या प्रतोदपदी जितेंद्र आव्हाडांची निवड केल्याचं पत्र जयंत पाटलांनी पोस्ट केलं आहे.(Big Breaking ) त्यामुळे आता अजित पवार गटाला व्हीप किंवा इतर पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करता येतील का? की अजूनही पक्षाकडून निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे आदेशच अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या इतर आमदारांना लागू असेल? यावर चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.