Big Breaking : कराड : राष्ट्रवादीचा एक गट काल (ता. २) अचानक सरकारमध्ये दाखल झाल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांच्या बंडाला आपले समर्थन नसल्याचे शरद पवारांनी जाहीर केले. हे प्रकार पक्षासाठी नवे नाहीत. आम्ही पुन्हा नव्याने पक्षबांधणी करू… अशी प्रतिक्रीया शरद पवार यांनी काल झालेल्या बंडानंतर व्यक्त केली होती. दरम्यान, आज पुन्हा एकदा शरद पवार नव्या जोमाने कामाला लागलेले दिसून आले. काही वेळापूर्वीच त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी प्रीती संगमावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. भाजपने वर्षभरापूर्वी शिवसेनेत उभी फूट पाडली. याच घटनेची पुनरावृत्ती एक वर्षानंतर झाली. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली असून, पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. (Big Breaking) राष्ट्रवादीचा मोठा गट भाजपने फोडला आहे. अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करुन राष्ट्रवादीच्या ८ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली.
कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन
दरम्यान, कालच्या बंडानंतर छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे राष्ट्रवादीचे मोठे नेते फुटल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Big Breaking) मात्र, या घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार नव्या जोमाने कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. शरद पवार कराडमध्ये पोहोचले, त्यावेळी तिथं पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुख, श्रीनिवास पाटील, इत्यादी नेते उपस्थित होते. कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केल्यानंतर शरद पवारांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले की, सध्या जी समाजविघातक प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीच्या विरोधात सगळ्यांनी उभं राहण्याची गरज आहे. (Big Breaking) भाजपचं सरकार सध्या देशासह महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. कित्येक महिन्यांपासून फोडाफोडीचं राजकारण सुरु आहे. एकोप्यानं राहणाऱ्या लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. चुकीच्या प्रवृत्ती सध्या डोकं वरती काढत आहेत.
हा शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्रत आहे. महाराष्ट्राचे राजकारण एवढ्या खालच्या दर्जाचे कधीच नव्हते. सध्या महाराष्ट्रातील सरकार या ना त्या कारणाने उलथवून टाकण्याचं काम सुरू आहे. (v) देशातल्या अनेक राज्यांमध्ये याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. चुकीच्या प्रवृत्ती सध्या डोकं वर काढत आहेत. या प्रवृत्ती विरोधात महाराष्ट्रातील शक्ती नक्की उभी राहिल. चूक करणाऱ्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता शांत बसणार नाही, अशी टीका शरद पवारांनी भाजपला उद्देशून केली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे आम्हाला राजकारणातील गुरूसमान आहेत. (Big Breaking) आज गुरु पोर्णिमा आहे. त्यामुळे आजच्या दिवशी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावरुन अपप्रवृत्तीच्या विरोधात लढण्याची सुरुवात केली आहे, असंही पवार म्हणाले.