Big Breaking : मुंबई : तुमचा लवकरच दाभोळकर होणार…अशी जीवे मारण्याची धमकी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आज सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर अकाऊंटवर देण्यात आली. या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची यासंदर्भात प्रतिक्रिया समोर आली आहे. (After threatening Sharad Pawar, opposition leader Ajit Pawar’s reaction came forward and said…)
केंद्र आणि राज्य सरकारनं या धमकीची गांभीर्याने दखल घ्यावी
“आदरणीय पवार साहेबांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरंच दाभोळकर होणार…’अशी देण्यात आलेली धमकी, हे गंभीर प्रकरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं या धमकीची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना तातडीनं गजाआड करावे. धमकीमागचा खरा मास्टरमाईंड शोधावा. (Big Breaking) अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावं, हेच राज्याच्या हिताचं असेल,” अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.
अजित पवार म्हणाले, आदरणीय पवार साहेबांचं संरक्षण करण्यास महाराष्ट्रातील जनता समर्थ आहे. परंतु डॉ. दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रीय झाल्या आहेत, ही बाब अधिक चिंताजनक आहे. निवडणुका जवळ येऊ लागल्यानं यापुढे जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषावादाचे असे मुद्दे उपस्थित करुन समाजात द्वेष निर्माण करण्याचे, दुही माजवण्याचे, मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न होतील. (Big Breaking) ते हाणून पाडले जातील. देशातील जनता आता सावध आहे. समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांच्या भूलथापांना भुलणार नाही. कुणाच्याही कटकारस्थानांना बळी पडणार नाही.
पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकीची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले. (Big Breaking) खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटीसाठी पोहोचलं आहे. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी या मागणीसाठी शिष्टमंडळ पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाले व याप्रकरणी तक्रार दाखल केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking : शरद पवारांनंतर संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी