Ajit Pawar News अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विखे पिता पुत्राच्या (Vikhe father son’s) यशस्वी खेळीमुळे विरोधी पक्षनेते अजित पवार (Big blow to Ajit Pawar )यांना मोठा झटका बसला आहे.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ( Ahmednagar District Central Cooperative Bank) अध्यक्ष उदय शेळके यांचे दुदैवाने काही दिवसांपूर्वी प्रदीर्घ आजाराने निधन झाले त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पदाची निवडणूक घेण्यात आली. त्यामुळे जिल्हा बँकेचे नवीन अध्यक्ष कोण, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला.
माजी आमदार शिवाजी कर्डिले
अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले. कर्डिले यांना दहा मते तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली. तसेच एक मत बाद झाले. जिल्हा बँकेच्या निवडीमध्ये विखे-पिता पुत्राची खेळी यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.
बँकेचे संचालक
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक दोन वर्षापूर्वी २०२० मध्ये झाली आहे. या निवडणुकीत बँकेच्या २१ संचालकांपैकी राष्ट्रवादीचे १०, काँग्रेसचे चार, भाजपचे सहा व एक शिवसेना असे पक्षीय संचालक विजयी झाले. कर्डिले विजयी झाल्यानंतर कर्डिले समर्थक व भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी काम पाहिले.