लहू चव्हाण
पाचगणी : भिलार ते कासवंड रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार व खासदार यांच्या माध्यमातून या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला असून प्रत्यक्षात खडीही पडली आहे. सदर पत्रकाराने कसलीही माहिती न घेता चुकीची व खोडसाळपणाची बातमी टाकली असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे सांगितले.
राजपुरे पुढे म्हणाले कासवंड-भिलार- दानवली या रस्त्यासाठी आ. मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून ७५ लाख रुपये व खा. श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून ३ कोटी ८९ लाख रुपये रुपये मंजूर झाले असून येत्या दोन ते तीन दिवसांत या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
लोकप्रतिनिधींना मात्र निवडणुकीतच कासवंडची आठवण येते, अशी बातमी प्रसिद्ध करणे निव्वळ खोडसाळपणा आहे. आमचा तालुक्यातील प्रत्येक गावात लोकसंपर्क असून आम्ही नागरिकांच्या सुख दुःखात कायम सोबत असतो. ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष गावात जाऊन कायम प्रयत्नशील असतो, असेही राजपुरे म्हणाले.