Beed News : बीड : कोणतीही निवडणूक असो, धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यातील लढतीची नेहमीच चर्चा होते. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर ताबा हा राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेचा विषय असल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान, या निवडणुकीत संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाल्यानंतर आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड देखील बिनविरोध झाली आहे. यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाली. तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गटाचे चंद्रकात कराड यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली आहे.
चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड देखील बिनविरोध
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची निवडणूक बिनविरोध झाली. (Beed News ) या निवडणुकीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या माजी चेअरमन, भाजप नेत्या पंकजा गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे हे दोघे बहिण-भाऊ एकत्र आले आहेत. यामुळे २१ सदस्यांचे संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे ११ संचालक तर धनंजय मुंडे यांच्या गटाचे १० संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. कारखान्याच्या हितासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही दोघे एकत्र आल्याची कबुली बहीण पंकजा मुंडे आणि भाऊ धनंजय मुंडे यांनी दिली आहे. (Beed News ) संघर्ष टाळून मुंडे बहीण-भाऊ एकत्र येणार? अशा हालचाली दिसून येत आहेत. मात्र, यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा झाली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Beed News : वारकऱ्यांच्या दिंडीत घुसली भरधाव रिक्षा; वारकरी जखमी