हनुमंत चिकणे
लोणी काळभोर, (पुणे) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना शंभर दिवसानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिंदाबाद, उध्दव ठाकरे जिंदाबाद, संजय राऊत आगे बढे हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देत जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवसेना शिरूर हवेली संघटक स्वप्नील कुंजीर, शाखा प्रमुख भाऊसाहेब कुंजीर, तुषार कुंजीर पृथ्वीराज कुंजीर, रामदास कुंजीर, नयन जनाली, काळूराम कुंजीर, भूषण कुंजीर, बाळासाहेब कुंजीर, बालाजी कांबळे, राजवर्धन कुंजीर, हर्षवर्धन कुंजीर, किरण कुंजीर, नाना झेंडे, सोमनाथ नहावले, दत्तात्रय कुंजीर, अजित कुंजीर, अतुल ठोंगे, आदि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी स्वप्नील कुंजीर म्हणाले यांनी न्याय देवतेच्या निर्णयाचे स्वागत करत भगवान के घर देर हे अंधेर नहीं अशी प्रतिक्रिया दिली.