अतुल जगताप
वडुज : शिवसेना प्रवक्ते खा संजय राऊत यांना जामीन मंजूर होताच वडूजनगरीत पुन्हा एकदा फटाक्यांची आतिषबाजी व जयघोष करीत शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिकांनी पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली.
खटाव शिवसेना माजी तालुकाप्रमुख युवराज पाटील, किशोर गोडसे, अभिजित गोडसे, संतोष सावंत, चैतन्य बर्गे यांच्या सहस्थानिक व्यापारी वर्ग सुध्दा सहभागी झाले होते. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, खा. संजय राऊत, आदित्य ठाकरे झिंदाबादच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
वडूज नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक, शेतकरी चौक व चौकाचौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. सुमारे एक तास फटाक्यांच्या अतिषबाजीने शिवसेनेचा आवाज आस्मानात घुमला.