मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामीन मंजूर झाला होता, मात्र आता देशमुखांच्या जामिनाला आता १० दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे देशमुख यांना पुन्हा तुरुंगात जावे लागण्याची शक्यता आहे.
सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्यायालयाने देशमुखांना दिलासा दिला आहे . मात्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सीबीआय सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. त्यामुळे देशमुखांच्या जामिनाला स्थगिती देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावलर अनिल देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. तब्बल तेरा महिन्यांनंतर अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाला आहे, मात्र सध्या अनिल देशमुखांच्या जामिनाला १० दिवसांची स्थगिती मिळाली आहे.
दरम्यान, अनिल देशमुखांचे वकील अनिकेत निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार , देशमुखांना उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सीबीआयच्या विनंतीनंतर उच्च न्यायालयाने जामिनावर १० दिवसांची स्थगिती दिली आहे .
न्यायालयाने जामीन मंजूर करताना देशमुखांचे पासपोर्ट प्रशासनाकडे जमा करणे , पुढील तपासात सहकार्य करणे अशा अटी लागू केल्या आहेत . त्यामुळे पुढचे १० दिवस अनिल देशमुख यांना तुरुंगातच राहावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे .