शब्दांकन – प्रा. सागर घरत (कुंभारगाव, ता. करमाळा)
Article – वय वर्ष ७०… पोटाला व वंशज नाही… काठीचा आधार घेऊन आपल्या ‘धन्या’ सोबत गुण्यागोविंदाने म्हातारपणीचा संसार सुरू होता… अशातच गेल्या वर्षी कुंकवाच्या आधाराने साथ सोडली… माणसाने भरलेल्या जगात नर्मदा आजीला साथ देणार कोणीच नाही… दरम्यान जनशक्ती संघटनेचा दौऱ्यात आजीने हंबरडा फोडला. मनातील एकटेपणा, आतिव दु:खत भावना व्यक्त करत आजीने आपल्या श्रूंना वाट मोकळी करुन दिली. (Article)
‘जनशक्ती’ संघटना धावली मदतीला
जनशक्ती संघटनेचा करमाळा तालुक्यात गाव भेट दौरा सुरू आहे. या दरम्यान संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील जनतेशी संवाद साधत होते. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत होते.
दरम्यान, काठी टेकत टेकत एक वयोवृद्ध आजी पाटील यांनी भेटली. आपल्या दु:खाचा पाढा वाचताना आजीला ढसाढसा रडू कोसळले.
पाटील यांनी आजीचे प्रश्न समजून घेतले. त्यानंतर जनशक्ती संघटनेच्या वतीने मदतीचा हात तर दिलाच शिवाय प्रशासनाला घरकुल आणि शौचालयाची सोय करण्याची विनंती त्यांनी केली. यासाठी त्यांनी स्वतः कागदपत्रांची पूर्तता करण्याची हमी देखील यावेळी दिली.
करमाळा तालुक्यातील बोरगाव येथे गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने वयोवृद्ध असलेल्या नर्मदा अंकुश दळवी यांची भेट जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांच्याशी झाली. यावेळी आजीची भेट झाली. आजीला मोठा आधार वाटला आणि मदत मिळाल्याने तिने जनशक्ती संघटनेचे आभार मानले.